गुगल मॅपवर वाट दाखवणार फिरंग आमिर

आता आमीर खान राहणार तुमच्यासोबत 

गुगल मॅपवर वाट दाखवणार फिरंग आमिर

मुंबई : आमीर खान उर्फ फिरंगी उद्यापासून आपल्या ड्राइवमध्ये येऊन आपल्यासोबत फिरणार आहे. काय गोंधळलात? हो... हे अगदी खरं आहे. भारतात असं पहिल्यांदाच होणार आहे. आमीर खानच्या सिनेमातील हे पात्र उद्या आपल्या गुगल मॅपवर दिसणार आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील फिरंगी मल्लाह गुगल मॅपचा वापर करणाऱ्यांसोबत उद्या रस्ते दाखवण्यास मदत करणार आहे. 

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या टीमने गुगल मॅपसोबत ही योजना आखली असून सिनेमाच्या मार्केटिंग करता हे बेंचमार्क असणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत प्रवासी आपल्या एंड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनवर फिरंगीसोबत ड्राइव करण्याचा पर्याय निवडू शकतात. या सगळ्यात आमीर खान युझर्ससोबत त्याच्या पाळलेल्या गाढवासोबत सवारी करताना दिसणार आहे. गुगल आणि वायआरएफचा वापर करणाऱ्यांना हा अद्भुत अनुभव घेता येणार आहे. 

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा एक वेगळा सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील दोन दिग्गज एकत्र काम करणार आहे. आमीर खान आणि अमिताभ बच्चन स्क्रीन शेअर करणार आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.