मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आहार खूप महत्त्वाचा असतो. कारण ते तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त ठेवते. एवढंच नव्हे तर शरीरातील साखर कंट्रोलकरण्यामध्ये आहार अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळेच टाईप 2 च्या रुग्णांना वेळेवर औषधे घेण्यास सांगितले जाते तसेच योग्य आहार आणि व्यायामाचे पालन करण्यास सांगितले जाते. याशिवाय टाईप 2 मधुमेहाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सुपरफूड खूप उपयुक्त मानले गेले आहेत.
ओट्समध्ये फायबर आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते, जे रक्तातील साखरेचे चयापचय आणि इन्सुलिन संवेदनशीलता नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे टाईप-2 डायबिटीजचा त्रास असलेल्यांनी नाश्त्यात ओट्सचे सेवन करणे चांगले ठरू शकते. लक्षात ठेवा की ओट्सचा अर्थ असा नाही की तुम्ही प्री-मिक्स केलेले किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या झटपट ओट्सचे सेवन करा. रोल केलेल्या ओट्ससह तयार केलेल्या पाककृती नेहमी तुमच्या नाश्त्याचा एक भाग बनवा.
ऑक्सिडेटिव्ह तणाव मधुमेहाची स्थिती बिघडू शकतो. त्यामुळे तुमच्या आहारात अँटिऑक्सिडेंटयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालक, कोबी, काळे इत्यादी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. यासाठी तुम्ही पालकाचा ज्यूस रोज पिण्याची सवय लावू शकता.
ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट जळजळांशी लढा देऊन आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून मधुमेहाचा धोका बर्याच प्रमाणात कमी करतात. याच्या सेवनाने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे बेरीचे सेवन टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त मानले जाते.
मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण नसल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. सॅल्मन फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात, जे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करून निरोगी हृदयाला मदत करतात. एवढेच नाही तर ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमताही सुधारते. ब्रिटिश न्यूट्रिशनल जर्नलच्या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सॅल्मन फिशचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.
मधुमेहासाठी सुपरफूड्सच्या यादीत ऍव्होकॅडो हे एक नाव समाविष्ट आहे. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, नाश्त्यामध्ये एवोकॅडोचे सेवन केल्याने साखर नियंत्रणात राहते. एवोकॅडोच्या आरोग्य फायद्यांबद्दल सांगायचे तर त्यात असलेले फायबर, पोटॅशियम आणि ल्युटीन सूज आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)