मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे होणारे आजार दूर ठेवण्यासाठी खास '७' टिप्स !

नागरिकांची दैना करून पावसाने आता विश्रान्ती घेतली असली तरी साचलेल्या घाण पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 30, 2017, 07:01 PM IST
मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे होणारे आजार दूर ठेवण्यासाठी खास '७' टिप्स ! title=

मुंबई : काळ झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई झाली. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले होते. या पूरपरिस्थितीत हजारो लोक पाण्यात अडकले होते. नागरिकांची दैना करून पावसाने आता विश्रान्ती घेतली असली तरी साचलेल्या घाण पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. हे आजार टाळण्यासाठी काही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

१. पाणी उकळून प्या. 

२. बाहेरचं काहीही खाणे-पिणे टाळा. 

३. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मुलांना खेऊ देऊ नका. 

४. जखम, दुखापतीतून सूक्ष्म जंतू शरीरात शिरू शकतात. त्यामुळे अस्वच्छ पाण्यापासून दूरच राहा.

५. घराबाहेर पडावंच लागणार असेल तर बुट घालून जा. जिन्ससारखे कपडे घालणंही टाळा.

६. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणि साबणाचा वापर करा. 

७. गरम पाणी आणि जंतुनाशक द्रव्य वापरून पाय धुवा. 
ताप, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.