अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस

School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Updated: Nov 13, 2022, 12:23 PM IST
अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस title=

School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता ही आकडेवारी समोर आलीय. (diseases like heart attacks, cardiovascular complications and stroke goes up in Mumbai) महापालिकेने सप्टेंबर 2022 पासून तर आतापर्यंत केलेल्या आरोग्य तपासणीचा हा अहवाल आहे. त्यामुळं पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी, त्यांना सकस-संतुलित आहार द्यावा. तसंच व्यायामाला प्राधान्य द्यावे, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हृदयविकाराचा झटका, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत आणि दमा यांसारख्या आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आरोग्य तपासणीत शालेय विद्यार्थ्यांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएमसीने आरोग्य तपासणी करण्यासाठी एक प्रकल्प सुरु केलाय. त्यात ही बाब पुढेल आलेय.

कशामुळे होतोय बीपी, शुगरचा त्रास

- चॉकलेट,स्नॅक्स, फास्ट फूड, जंक फूडचं अतिसेवन
-मोबाील, लॅपटॉप, टीव्ही पाहण्याची सवय

कशी घ्याल मुलांची काळजी?

- तुमच्या मुलांना मोबाईल, लॉपटॉप, टीव्हीपासून दूर ठेवा
- पोहणे, सायकल चालवणे असे व्यायाम द्या
- मुलांना ताजी फळं, भाज्या सकस आहार द्या

ताज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्राथमिक सर्वेक्षण अहवालानुसार, मुंबईतील 18-69 वयोगटातील 34 टक्के लोकसंख्या उच्च रक्तदाबाच्या आणि 20 टक्के मधुमेही आहेत.  पालिकेच्या अहवालात असे आढळून आले की उच्च रक्तदाबाची लक्षणे असलेल्या 34 टक्के नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन आहारात 9 ग्रॅम मीठ वापरले. यूएन एजन्सीनुसार, दररोजच्या आहारात 5 ग्रॅम मीठ पुरेसे आहे.