मुंबई : मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की सर्वच नाकं मुरडतात. मात्र
हा मुळा किती फायदेशीर आहे याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. पण मुळा आणि मुळ्याची पाने हे गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे. तसेच मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येऊ शकते. सलादमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश करा. डायटीशियन शैलजा त्रिवेदीनुसार मुळ्याच्या पानांची भाजी बनवताना त्यामध्ये चवीनुसार लिंबूचा रस मिसळा. यामुळे भाजीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे याचे फायदे अजूनच वाढतात. शैलजा त्रिवेदी सांगत आहेत मुळ्याचे पान खाण्याचे 10 फायदे...
मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करते. त्यामुळे मुळा रोज आपल्या जेवणात असणं आवश्यक आहे. मुळ्याच्या भाजीसोबत मुळ्याची भजी आणि कोशिंबीर देखील खाऊ शकता.
त्वचा चांगली होण्यासाठी कायम सगळे प्रयत्नशील असतात. मुळा किंवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते. त्यामुळे मुळ्याचे सेवन करा.
मुळ्याच्या पानांमध्ये फायबर असतात. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. तसेच मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही फायदा होतो.
हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हर कंट्रोल राहते आणि डायबिटीजपासून बचाव होतो. हल्ली शुगरचा त्रास सगळ्यांनाच होतो अशावेळी मुळ्याच्या पानांची भाजी किंवा भजी अतिशय फायदेशीर आहे.
यामध्ये आर्यन, फॉस्फोरस असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढते आणि कमजोरी दूर होते. अशक्तपणा कमी करण्यासाठी मुळ्याची भरपूर मदत होते.
यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. जे युरिनसंबंधीत प्रॉब्लम दूर करण्यात इफेक्टिव्ह आहे. भरपूर पाणी पिण्याबरोबरच मुळा देखील फायदेशीर आहे.
यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. जे पाइल्सची समस्या टाळण्यात मदत करतात.
यामध्ये कॅल्शिअम असते. जे पॉईंट पेन टाळण्यास मदत करतात.
मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.