Apple स्मार्टवॉचने वाचवला महिलेचा जीव, हार्टअटॅकच्या आधीच ''हार्ट पल्स''ची सूचना

 मोबाईलपासून ते वॉचपर्यंत Apple चे सर्व प्रोडक्टस हे भारीच असतात.

Updated: Jul 9, 2021, 09:11 PM IST
Apple स्मार्टवॉचने वाचवला महिलेचा जीव, हार्टअटॅकच्या आधीच ''हार्ट पल्स''ची सूचना

मुंबई : मोबाईलपासून ते वॉचपर्यंत Apple चे सर्व प्रोडक्टस हे भारीच असतात. Appleच्या वॉचला खरचं स्मार्टवॉच का म्हणतात, हे सिद्ध झालंय. एका महिलेला Apple च्या स्मार्ट वॉचमुळे जे समजलं ते तिला स्वत:च्याही लक्षात आलं नव्हतं.  Appleच्या स्मार्टवॉचमुळे त्या महिलेला हार्ट पल्स वाढल्याचे सूचित केल्यानंतर तिला हृद्यविकाराचा त्रास असल्याचं समजलं.  WZZM 13 च्या रिपोर्टनुसार,  मिशिगन येथील या महिलेला रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याबद्दल समजलं. पण त्याआधीच  Apple च्या स्मार्टवॉचने  या महिलेला याबद्दल सूचित केल्याने या महिलेने Apple वॉचचे आभार मानले आहेत.  डायने फेनस्ट्रा असं या महिलेचं नाव आहे. (apple watch notified women about to heart attack)

डायनेला तिच्या स्मार्टवॉचने हार्ट पल्स वाढल्याबाबत सूचित केलं होतं. यानंतर डायनेने तिच्या पतीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर दोघे उपचारासाठी रुग्णालयाच्या दिशेने निघाले. त्यानंतर डायनेला हृदय विकाराचा झटका आल्याचं सिद्ध झालं. "22 एप्रिलला दर मिनिटाला हृदयाचे  169  ठोके पडत होते, त्या दिवशी मी केवळ 12 पाऊलं चालली होती. हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझ्या पतीला कॉल करुन  बोलावलं. मी माझ्या पतीला याबाबत सांगितलं की हे सर्व याच्याशी संबंधित आहे? यानंतर माझ्या पतीने मला डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं", असं डायनेने म्हटलं

दररोज तपासा हृद्याचे ठोके 

"महिलांमध्ये हृद्यविकाराची लक्षणं वेगळी असतात. मला माझा डावा हात खालच्या बाजूला नेताना त्रास जाणवत होता. तसेच डाव्या पायाला थोडी सूज होती. तसेच खांद्याही दुखत होता" डायनेने  म्हटलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डायनेने  आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या. त्यानंतर ब्लॉकेजमुळे हा त्रास होत असल्याचं समजलं. या सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर डायनेने सर्वांना  सकाळी उठल्यानंतर हार्ट रेट तपासायला हवं, असं आवाहन केलं.