मुंबई : मध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे. केस, त्वचा, ओठ यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर ठरते. फक्त त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. तुमच्या सौंदर्याच्या समस्या दूर करण्यासाठी मधाचा अशाप्रकारे वापर करा.
1. हेअर कंडीशनर म्हणून मधाचा चांगला वापर होतो. केस अत्यंत कोरडे असल्यास केसांना मध लावा आणि ३-४ मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केसांची चमक परत येईल. केस मुलायम होतील. त्याचबरोबर केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. खोबरेल तेलात मध मिसळून केसांवर लावल्यास अधिक फायदा होईल.
2. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करु शकता. त्यासाठी एक चमचा मधात जोजोबा ऑईल आणि चिमुटभर हळद घाला. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. निस्तेजपणा कमी होऊन चेहऱ्याची चमक वाढेल.
3. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करु शकता. त्यासाठी रोज थोडेसे मध चेहऱ्यावर लावा. डाग दूर होऊन चेहरा चमकदार होईल.
सनबर्नपासून सुटका मिळवण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर ठरते. त्यासाठी कोरफड जेल आणि मध एकत्र करुन त्वचेवर लावा.
4. कोरड्या, फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ओठांना मध लावा. त्यासाठी बदामाच्या पेस्टमध्ये मध मिसळा आणि ओठांवर लावा. असे नियमित केल्यास ओठ मुलायम होतील.