मुंबई : चुकीच्या आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढू लागलं आहे. परिणामी यामुळे भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. तुम्हालाही वाढलेले वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आम्ही तुम्हाला बेटी फॅट कमी करण्यासाठी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
आहारतज्ज्ञ डॉ रंजना सिंह यांच्या मते, लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, युरिक ऍसिड वाढणं आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वाढलेलं वजन आणि बेली फॅट कमी करणं महत्त्वाचं आहे.
बेली फॅट कमी करण्यासाठी 'हा' काढा फायदेशीर
तुळस आणि ओवा हे दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. एक चमचा वाळलेल्या ओवा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी 5 तुळशीची पाने सकाळी ओव्याच्या पाण्यात उकळा. आता एका ग्लासमध्ये पाणी गाळून त्याचं सेवन करा. रिकाम्या पोटी हे पेय सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
या पेयांचं करा सेवन
ग्रीन टी तुम्हाला वजन कमी करण्यातही मदत करू शकते. ग्रीन टी कॅटेचिन आणि कॅफिनचा समृद्ध स्रोत मानला जाते. हे चयापचय वाढवण्यात मदत करते. यामध्ये आढळणारे कॅफिन फॅट बर्न करण्यास फायदेशीर. तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन करू शकता.
बेली फॅट कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीदेखील तुमची मदत करू शकते. ब्लॅक कॉफीमध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय आहे. सकाळी रिकाम्या पोटी किंवा झोपण्यापूर्वी याचं सेवन करा.