मुंबई : आपल्या आरोग्याचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तसेच फिट राहण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात पाण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. त्यामुळे पुरेसे पाणी शरीराला मिळणे गरजेचे असते.
जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा शरीराला पाण्याची गरज अधिक असते. यासाठी सकाळी उठताच २ ते ३ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात.
१. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच रक्त शुद्ध होते.
२. पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते.
३. शरीरातीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही पाणी महत्त्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीरातची इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.
४. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, एपिलेप्सी, लठ्ठपणा, अस्थमा, टीबी, किडनीचे आजार, गॅस, डायबिटीज, डायरिया, पाईल्स, कॅन्सर, बद्धकोष्ठता, डोळे, कान, नाक आणि घश्याचे आजार दूर होण्यास मदत होते.
४. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
५. वजन कमी करायचे असल्यास सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यावे.
६. सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास घश्याचे आजार, मासिक पाळी, डोळ्यांचे, मूत्राचे आणि किडनीसंबंधित आजार दूर होतात.