असेही गुणकारी नासलेले दूध

जाणून घ्या नासलेल्या दूधाचे फायदे

Updated: Mar 3, 2019, 04:18 PM IST
असेही गुणकारी नासलेले दूध title=

मुंबई : नासलेले किंवा फाटलेले दूध अनेक जण खराब झाले किंवा या दूधापासून केवळ पनीर बनवले जाऊ शकते असा अनेक जणांचा समज असतो. पण नासलेल्या दूधाचा अनेक प्रकारांनी केलेला वापर हा अतिशय फायदेशीर ठरतो. जितके फायदे दूधाचे असतात तितकेच फायदे नासलेल्या दूधाचेही असतात. दूध कसेही कच्चे उकळलेले किंवा नासलेले असले तरी त्या दूधात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. दूध फाटल्यामुळे त्यात आंबटपणा वाढतो किंवा त्याची चव तेवढी चांगली लागत नाही. दूध खराब होणे किंवा नासणे ही अतिशय सर्वसामान्य बाब आहे. फाटलेल्या दूधाचा अनेक प्रकारे वापर करता येऊ शकते. 

रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनवते

नासलेल्या दूधाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. या पाण्याने मांसपेशींची ताकद वाढते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या पाण्यात रोगांचा सामना करण्याची ताकद असते. नासलेल्या दूधाच्या पाण्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 

कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवते

अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, नियमितपणे नासलेल्या दूधाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रोल नियंत्रणात असेल तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकची शक्यताही कमी असते. 

कणीक मऊ बनवते

नासलेल्या दूधाच्या पाण्याचा उपयोग कणीक मळण्यासाठी करता येऊ शकतो. यामुळे चपाती मऊ बनतात तसेच त्याची चवही वाढवते. यातून अधिक प्रोटिन्सही मिळतात. रक्तप्रवाह तसेच त्वचेच्या पेशीही उत्तम राहतात. 

त्वचा तजेलदार बनवते

नासलेल्या दूधात बेसन, हळद आणि चंदनाचा लेप चेहऱ्यालाही लावता येऊ शकते. नासलेले दूध चेहरा चमकदार बनवण्यास मदत करते. या दूधाने चेहरा मुलायमही होतो.

अंड आणि नासलेले दूध

नासलेल्या दूधातील पाणी वेगळे करून उरलेला पदार्थ अंड्यात एकत्र करून खाऊ शकतात. यामुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात मिळते.