सावधान! लघवीवाटे रक्तस्राव होणं 'या' जीवघेण्या आजाराचं लक्षण

प्रायव्हेट समस्यांवर उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं कारण बनू शकतं. 

Updated: May 6, 2022, 03:34 PM IST
सावधान! लघवीवाटे रक्तस्राव होणं 'या' जीवघेण्या आजाराचं लक्षण title=

मुंबई : टॉयलेटसंदर्भातील समस्यांबाबत खुलेपणाने बोलणं आपण अजूनही टाळतो. अशावेळी काही लोकं लाज वाटत असल्यामुळे या समस्या अंगावर काढतात. मात्र असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जर वेळी प्रायव्हेट समस्यांवर उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं कारण बनू शकतं. शिवाय यासाठी वेळोवेळी तपासणी करणंही तितकंच गरजेचं आहे. 

ब्रिटनचे डॉ. मिरियम स्टॉपर्ड यांच्या सांगण्याप्रमाणे, काही लोकांना लघवीवाटे रक्तस्राव होतो. हे एक गंभीर समस्येचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे लघवीच्या वेळी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.

डॉ. मिरियम यांच्या सांगण्यानुसार, बीटरूटच्या सेवनामुळे अनेकदा लघवीचा रंग गुलाबी होतो. ज्यामुळे लघवीदरम्यान रक्तस्राव झाल्यासारखं वाटू शकतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्लॅडर कॅन्सरचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवीवाटे रक्तस्राव होणं. याला हेमट्यूरिया (Haematuria) असंही म्हटलं जातं. ब्लॅडर कॅन्सरच्या 80 टक्के रूग्णांमध्ये गे लक्षण दिसून येतं.

ज्या व्यक्तींना लघवीवाटे रक्तस्राव होत असेल त्या प्रत्येकाला कॅन्सरचं निदान होईल असं नाही. यामागे विविध कारणं असू शकतात. जसं की, युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा तीव्र पद्धतीचा व्यायाम.

काही औषधांच्या सेवनामुळेही लघवीवाटे रक्तस्राव होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर कोणी, बीट किंवा ब्लॅकबेरीचं सेवन करत असेल तर त्यावेळीही युरिनचा रंग गुलाबी होण्याची शक्यता आहे. तसंच महिलांना पिरीयड्सच्या काळात लघवीवाचे रक्तस्राव होऊ शकतो.