मुंबई : पाण्याच्या महत्त्वावर आपण शाळेत खूप निबंध लिहिलेत. पण आजच्या काळात ज्या प्रकारे जलप्रदूषण वाढतंय. अशा परिस्थितीत आपण पाण्याचे सेवन कसं करावं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. पाण्याच्या शुद्धतेकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे.
सध्या आपण आधुनिक होतोय, त्यामुळे पाण्याचा हा विषय जरा आधुनिक व्हायला हवा. आजकाल एक गोष्ट खूप ऐकायला मिळतं की, उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणी आरोग्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर आहे? उत्तर जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. पुरेसं पाणी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या फायदेशीर ठरतं. इथे पाणी म्हणजे स्वच्छ पाणी. तुम्ही पाणी उकळू शकता किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी RO वापरू शकता.
जर तुम्हाला वाटत असेल की, उकळलेलं पाणी 5 ते 6 मिनिटं स्वच्छ असेल तर तुम्ही चुकीचे आहात. नळाचं पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटं गरम करावं लागतं. पण आता प्रश्न असा आहे की हे पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे का? उकळत्या पाण्यावर, पाण्यातील जीवाणू मरतात. शिसं, क्लोरीन सारखी अनेक घातक रसायनं पाण्यात राहतात.
फिल्टर केलेलं पाणी उकळलेल्या पाण्यापेक्षा जास्त स्वच्छ मानलं जातं. RO सहजतेने शिसे आणि क्लोरीन सारखी घातक रसायनं जिवाणूंसह काढून टाकतं ज्यामुळे ते पिण्यायोग्य बनते.