Cheapest Remedy To Control Diabetes: भारतामध्ये मधुमेहाचे 10 कोटींहून अधिक रुग्ण आहेत. तसेच दिवसोंदिवस या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भविष्यामध्ये भारतातील मधुमेह रुग्णांचा आकडा 20 कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मधुमेहाला सामान्य भाषेमध्ये साखरेशी संबंधित आजार असं म्हणतात. या आजारामध्ये शरीरामधील साखरेचं प्रमाण वाढतं. शरीरामधील साखर वाढल्याने अंतर्गत अवयवांवर त्याचे वाईट परिणाम होतात. मधुमेहाला पूर्णपणे नियंत्रणात आणता येत नाही. त्यामुळेच मधुमेहाचा त्रास असेल तर तो नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं असतं.
सामान्यपणे डॉक्टर साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर वेगवेगळी औषधं देतात. मात्र कांद्याचा अर्क मधुमेहावर रामबाण उपाय ठरु शकतो. यासंदर्भातील एका संशोधनाचा अहवाल समोर आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदा हा मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त आणि परिणामकारक आहे.
सन 2022 मध्ये अमेरिकातील सेन डियागोमध्ये एडोक्राइन सोसायटीच्या 97 व्या वर्षिक बैठकीमध्ये कांद्याच्या अर्काचा मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो यासंदर्भातील संशोधन अहवाल सादर करण्यात आला. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, नियमितपणे कांद्याच्या अर्काचं सेवन केल्याने रक्तामधील साखरेचं प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. इतकेच नाही तर कांद्याचा अर्ज मधुमेहाबरोबरच कोलेस्ट्रॉल आणि स्थूलपणा नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायद्याचा ठरु शकतो. या अभ्यासामधून समोर आलेली आकडेवारी पाहून संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. भविष्यात कांद्याचा अर्ज हा मधुमेहावरील सर्वात स्वस्त उपचार पद्धती म्हणून वापरता येऊ शकतो, अशी शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे.
हे संशोधन उंदरांवर करण्यात आलं आहे. यामध्ये मधुमेह असलेल्या उंदरांना वजनाप्रमाणे 400 मिलीग्राम आणि 600 मिलीग्राम कांद्याचा अर्ज देण्यात आला होता. या उंदरांच्या रक्तातील साखरेचं प्रमाणे 50 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं दिसून आलं. ज्या उंदरांना या प्रयोगादरम्यान कांद्याचा अर्क देण्यात आला होता त्यांचं कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात होतं. या संशोधनामध्ये संशोधकांनी समोर आलेल्या गोष्टी मांडताना कांद्याचा अर्ज मधुमेहाला नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सर्वात सहज उपलब्ध होणारी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. कांदा हा अनेक आजारांवर उपचार म्हणून फायद्याचा ठरतो. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल, नियमित व्यायाम, नियमितपणे त्यावर लक्ष ठेवणं आणि वजनावरील नियंत्रण तसेच नियंत्रित आहार या गोष्टींची गरज असते.