कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट फुफ्फुसांसाठी धोकादायक?

कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका देशभरात वाढतोय. 

Updated: Jun 28, 2021, 10:01 AM IST
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट फुफ्फुसांसाठी धोकादायक?	 title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका देशभरात वाढतोय. दरम्यान आता असं समोर आलं आहे की, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा फुफ्फुसांच्या ऊतींशी संबंध आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. कोविड -19 लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी ही माहिती दिलीये.

आतापर्यंत 12 राज्यात 51 प्रकरणं समोर

कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवं रूप 11 जून रोजी समोर आलं. अलीकडेच त्याला 'चिंतेचा विषय' म्हणून वर्गीकृत केलं गेलंय. आतापर्यंत देशातील 12 राज्यांमध्ये डेल्टा प्लसची 51 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या प्रकारातून संसर्ग होण्याचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.

डॉ. अरोरा यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा प्लसचे फुफ्फुसांच्या जवळपास अधिक अस्तित्व असल्याचं आढळलं. परंतु हा अधित धोकादायक असून यामुळे नुकसान होतं याची अद्याप पुष्टी झालेली नाही. याचा अर्थ असा नाही की, यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात किंवा तो अधिक संसर्गजन्य आहे.

डेल्टा प्लसच्या जितक्या स्वरूपांची ओळख पटली आहे कदाचित त्यापेक्षा जास्त प्रकरणं असू शकतात. कारण असे बरेच लोकं असण्याची शक्यता आहे ज्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत मात्र तरीही ते संक्रमण पसरवत आहेत.