अंड्यासोबत चुकूनही या पदार्थांचं सेवन करू नका; नाहीतर होईल एलर्जी

शरीराला प्रोटीनची गरज असताना अंडं खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

Updated: Jun 26, 2021, 01:25 PM IST
अंड्यासोबत चुकूनही या पदार्थांचं सेवन करू नका; नाहीतर होईल एलर्जी  title=

मुंबई : शरीराला प्रोटीनची गरज असताना अंडं खाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याचप्रमाणे अंड्यामध्ये प्रोटीन व्यतिरीक्त व्हिटॅमीन आणि खनिजाचंही प्रमाण मुबलक असतं. अंड्याच्या सेवनाने तुमचं वजन न वाढता आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने अंड्याचं सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

आयुर्वेदानुसार आपण बर्‍याच वेळा अशा गोष्टींचं सेवन करतो, ज्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. यामुळे आणि थकवा, मळमळ आणि बरेच रोग इत्यादी तक्रारी उद्भवू शकतात. तसंच, काही पदार्थ असे आहेत जे अंड्यांसह खाल्ल्यास एलर्जी होऊ शकते.

साखर 

साखरेचा कधीही कधीच अंड्यांबरोबर वापर करू नये. या दोन्ही पदार्थांचं मिश्रण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. या दोन्हीमध्ये अमीनो ऍसिड असतं. यांच्या एकत्र सेवनाने व्यक्तीच्या शरीरात टॉक्सिनमध्ये रुपांतर होतं. यामुळे रक्तामध्ये गुठळ्याही होऊ शकतात.

बेकन

मांसाहारी लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड आणि त्यासोबत बेकन खाण्याचा पर्याय स्विकारतात. मात्र, बेकन आणि अंड एकत्र खाल्ल्यामुळे शरीर सुस्त होऊ लागतं. याशिवाय अंडं आणि बेकन यांच्यात हाय प्रोटीन असचं. याशिवाय यामध्ये चरबीही जास्त असल्याने वजन वाढीची समस्या उद्भवू शकते.

चहा

बऱ्याचदा लोकांचा आवडता नाश्ता म्हणजे चहा आणि त्यासोबत अंड किंवा अंड्याचा कोणताही पदार्थ. प्रामुख्याने सकाळी अंड खाणं फायदेशीर आहे. मात्र चहा घेतल्यानंतर लगेच अंड खाल्ल्यास शरीरामध्ये टॉक्सिन तयार होण्याची भीती असते. याचा आपल्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याचीही शक्यता आहे.

सोया मिल्क

सोया मिल्क आणि अंडी या दोन पदार्थांचं देखील एकत्र कधीही सेवन करू नये. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरातील प्रोटीन शोषून घेण्याची क्षमता असते जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं.