close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !

कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

Updated: Feb 2, 2018, 07:13 PM IST
अंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !

मुंबई : कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

 ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात अंड खाणं हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. मात्र अंड्यातील पिवळ्याभागामध्ये कोलेस्टेरॉल अधिक असल्याने अनेकजण केवळ पांढरा भाग खाणे पसंत करतात. परंतू  योग्य प्रमाणात अंड्याचा आहारात समावेश केल्यास ते आरोग्यदायी ठरते.

अंड कसे फायदेशीर ठरते ?

अंड्यामध्ये ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड आढळते. हे एका प्रकारचे पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आहे. त्याचा होणारा परिणाम ठाम आणि नेमका अजूनही समजला नसला तरीही ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड pro-inflammatory eicosanoids कमी करून ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसेच अंड्यामध्ये choline, बी कॉम्प्लॅक्स, व्हिटॅमिन घटक आढळतात. यामुळे पेशींचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. परिणामी वय, लिंग यानुसार वाढणारा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

किती प्रमाणात अंड्याचे सेवन करणे सुरक्षित आहे ?

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी किंवा आरोग्यादायी फायद्यांसाठी अंड्याचा आहारात समावेश करताना त्याचे योग्य प्रमाण जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार अंडी विकत घ्या. काही अभ्यास आणि संशोधनाच्या अहवालानुसार,

Journal Breast Cancer Research च्या 2003 साली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, पौंगंडावस्थेच्या काळात ज्या स्त्रियांनी आहारात अंड, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा पुरेसा समावेश केला असेल त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर  जडण्याचे प्रमाणा कमी असते. नियमित अंड्याचे सेवन करण्याची सवय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका सुमारे 18% कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Epidemiology, Biomarkers & Prevention च्या  2005 मधील अभ्यासानुसार, आठवड्याला सुमारे 6 अंडी खाणार्‍या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जडण्याचा धोका त्यापेक्षा कमी अंडी खाणार्‍यांच्या तुलनेत सुमारे 44% कमी होते.