Diabetes type 2 होण्यापासून थांबवायचे आहे, तर काय करावे? उपाय जाणून घ्या

इंसुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना मधुमेह प्रकार 2 होण्याचा धोका जास्त असू शकतो. इन्सुलिन प्रतिरोधक आणि हाय ब्लड शुगर दोन्ही माणसाच्या (Metabolism) चयापचणावर परिणाम करतो.

Updated: Mar 23, 2021, 06:10 PM IST
Diabetes type 2 होण्यापासून थांबवायचे आहे, तर काय करावे? उपाय जाणून घ्या title=

मुंबई : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी एका ठराविक वेळी नाष्टा करणे खूप महत्वाचे आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक सकाळी 8.30 च्या आधी नाष्टा करतात त्यांच्यामध्ये मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो. शिकागोच्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार सकाळी लवकर नाष्टा केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनचा प्रतिरोधक कमी असतात. हे संशोधन इंडोक्रिन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत वर्चुअली सादर केले गेलं आहे.

सकाळी लवकर न्याहारी खाणे खूप महत्वाचे

इंसुलिन प्रतिरोधक आणि  रक्तातील जास्त साखरेची पातळी दोन्हीमुळे मधुमेह टाइप 2 (Diabetes type 2) वाढण्याचा धोका असतो. मधुमेहावरील(Diabetes) इंसुलिन प्रतिरोधक तेव्हा शरीरात असते जेव्हा, आपले शरीर त्या  इंसुलिनवर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्याच वेळेस तो ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करण्यास असक्षम असतो.

या लोकांना जास्त धोका

इंसुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना मधुमेह प्रकार 2 होण्याचा धोका जास्त असू शकतो. इन्सुलिन प्रतिरोधक आणि हाय ब्लड शुगर दोन्ही माणसाच्या (Metabolism) चयापचणावर परिणाम करतो. संशोधक मरियम अली म्हणतात, "मेटाबोलिझमचे कार्य बिघडले की, मधुमेह वाढतो.  या विषयावर तुम्हाला माहिती मिळणे तितकेच आवश्यक आहे."

मधुमेह प्रकार 2 होण्याचा धोका कमी करतो

संशोधकांनी पहाटेचा नाष्टा चयापचय (Metabolism) आरोग्यावर किती प्रमाणात प्रभावी ठरू शकतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संशोधकांनी नेशनल हेल्थ एंड न्यूट्रिशन सर्वेक्षणात समाविष्ट 10 हजार पेक्षा जास्त प्रौढांच्या डेटाचा अभ्यास केला आहे. त्यांनी आहार सेवन करण्याच्या एकूण कालावधीच्या आधारे सहभाग घेतलेल्या लोकांना तीन गटात विभागले.

यासाठी त्याने 10 तासांपेक्षा कमी, 10-13 तासांपेक्षा आणि13 तासांपेक्षा जास्त असे गट केले.

यानंतर, त्यांनी खाण्याच्या कालावधीनुसार (सकाळी 8.30 च्या आधी किंवा नंतर) असे सहा उप-गट तयार केले. कोणत्या वेळी काय खाल्याने किंवा रिकामं पोट असल्याने नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे रक्तातील साखरेची पातळी आणि  इंसुलिन प्रतिरोधक यांचा संबंध येतो?  हे शोधण्यासाठी डेटाचा अभ्यास केला.

निकालांनी हे सिद्ध केले की, रिकाम्या पोटी असलेल्या आणि उशीरा खाणाऱ्या लोकांच्या गटामधील रक्तातील साखरेची पातळीत स्पष्ट फरक दर्शवला नाही.

इन्सुलिनचा प्रतिरोधक हा खाण्याच्या आधी जास्त प्रभवी होता, परंतु सकाळी 8.30च्या नाष्टा नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनचा प्रतिरोधक हा सर्व गटात कमी आढळला. "हे निष्कर्ष सूचित करतात की लवकर खाण्याच्या सवयीमुळे तुमचा मधुमेह कमी होऊ शकतो.