मुंबई : सडपातळ आणि सुंदर दिसणे ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे स्वत:च्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. खासकरुन रात्री असे पदार्थ असतात जे अजिबात खाल्ले नाही पाहिजेत. रात्रीच्या वेळेस खास करुन सफेद रंगाचे पदार्थ खाऊ नयेत.
लठ्ठपणा कमी करायचा असल्यास रात्रीच्या वेळेस दूध पिऊ नये. दूध प्यायचेच असेल तर लो फॅट दुधाचे सेवन करा.
रात्रीचे दही पचनास त्रासदायक ठरते. त्यामुळे रात्रीचे दही खाणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही ताक वा रायता खाऊ शकता.
साखरेच्या ऐवजी तुम्ही खाण्यात ब्राऊन शुगरचा वापर करा.
रात्रीच्या वेळेस भात खाल्ल्यास त्याचा सरळ परिणाम तुमच्या वजनावर होतो. तुम्ही भाताचे शौकीन असाल तर ब्राऊन राईसचा वापर करा. हा हेल्दी आणि बेस्च ऑप्शन आहे.
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रात्रीचे व्हाईट बटर खाणे टाळावे.
जितके शक्य असेल तोवर रात्रीचे मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. पुरी, पराठा, बिस्कीट्ससारखे पदार्थ रात्रीचे खाऊ नयेत.
क्रीममध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे रात्री क्रीमचे सेवन केल्यास शरीरास नुकसानकारक ठरु शकते.