आहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका

  आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो. 

Updated: Dec 19, 2017, 10:42 PM IST
आहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका  title=

मुंबई :  आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो. 

हार्ट अटॅक येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ आहेत मग तुम्ही डाएटकडे लक्ष देणार असाल तर कॉलेस्ट्रेरॉलचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे पदार्थ नक्की आहारात ठेवा.  

कांदा -

कांद्याचा आहारात समावेश केल्याने त्यातील अॅ न्टिऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सचा सक्षमतेने सामना करतात. तसेच कांद्यामुळे कोलेस्टेरॉल काबूत राहण्यास मदत होते.

मेथीचे दाणे -

मेदयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात साचून राहिलेले मेद कमी करण्यास मेथी मदत करते. तसेच मेथीच्या सालींमध्ये असलेले फायबर कोलेस्टोलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे भाजीत मेथीच्या दाण्यांचा कूट टाकावा. मात्र मेथी चवीला कडू असल्याने प्रमाणापेक्षा अधिक टाकू नका.

अळशी - 

अळशीसुद्धा ओमेगा 3 फॅटी अॅ सिडस व फायबरचा उत्तम पुरवठा करते. अळशीच्या सेवनाने कोलेस्टोलचे प्रमाण काबूत राहते. उच्च रक्तदाब व हृदयरोगापासून आपला बचाव होतो. आहारात अळशीचा वापर करण्यासाठी त्या कुटून भाजीत किंवा आमटीत टाकावी. अळशीतील फायबर घटक भाजीचा रस्सा घट्ट करतात. त्यामुळे ती वरून टाकावी किंवा चटणीत त्याचा समावेश करावा.

लसूण –

लसणाचा वापर भारतीय स्वयंपाकघरात सर्रास होतो. लसणाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते, रक्तदाब काबूत राहतो तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते हे संशोधनातून समोर आले आहे.

सुकामेवा - 

बदाम , पिस्ता, अक्रोड यांमधील पॉली अनसॅच्युरेटेड फ़ॅटी अॅसिडस धमन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. सुकामेवा मीठ किंवा साखर न टाकता खावेत.