Special Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये

Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अ‍ॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय.   

नेहा चौधरी | Updated: Jun 24, 2024, 10:15 AM IST
Special Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये title=
garlic mint chutney for high uric acid reducing Chutney Recipe in marathi

Special Chutney For Uric Acid :  हाय यूरिक अ‍ॅसिडची समस्या आजकाल लोकांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. तरुण पिढीही त्यातून सुटलेली नाही. या समस्येमागील मुख्य कारण म्हणजे बदलेली जीवनशैली आणि अनहेल्दी आहाराच सेवन. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं तेव्हा हाडांमध्ये गॅप निर्माण होते आणि त्या भागावर सूज येते. यातून गाऊट होतात, ज्यामुळे सांध्यांना सूजसोबत तीव्र वेदनांना होतात. पूर्वी ही समस्या सहसा वृद्ध लोकांमध्ये दिसून यायची. पण आता ही समस्या तरुण पिढीमध्येही झपाट्याने वाढताना दिसत आहे. 

उच्च युरिक अ‍ॅसिडच्या समस्येवर मात करण्यासाठी, लोक औषधांसोबत इतर अनेक घरगुती उपाय करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उपायाबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमची समस्या दूर होण्यास मदत होईल, आहार तज्ज्ञ सांगतात. 

'ही' खास चटणी युरिक अ‍ॅसिडवर रामबाण उपाय!

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, लसूण-पुदिन्याची चटणी ही युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. या चटणीच्या सेवनाने प्युरिन पचण्यास मदत होते आणि गाउटचा त्रासही कमी होण्यास फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे ही चटणी तुम्ही घरी सहज बनवू शकता. चला तर मग या चटणीचे फायदे आणि या चटणीची रेसिपी जाणून घेऊयात. 

हिरव्या चटणीचे फायदे!

लसूण-पुदिन्याची चटणी प्युरिनच्या पचनाचा वेग तर वाढवतेच शिवाय प्रथिनांच्या पचनास गती देण्याच कामही करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुदीना शरीरातील हायड्रेशन राखण्यास फायदेशीर ठरतं. शिवाय विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्यास मदत करतं. यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने हाडांमधील वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे गाउटच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 

चटणीसाठी साहित्य

पुदिन्याची ताजी पाने
4-5 लसूण पाकळ्या
1 हिरवी मिरची
1 टीस्पून मोहरीचे तेल
चवीनुसार मीठ

कृती 

ही चटणी बनवण्यासाठी आधी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लसूण पाकळ्या सोलून पुदिन्याच्या पानं आणि हिरवी मिरची एकत्र पाटयावर वाटा किंवा मिक्सरमधून बारीक करुन घ्या. आता त्यात चवी पुरती मीठ घाला. हवं असल्यास तुम्ही मोहरीच्या तेलाचा तडकाही या चटणीला देऊ शकता.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)