पुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कापूरचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

जाणून घेऊया भीमसेनी कापूराचे महत्त्वपूर्ण फायदे.

Updated: Jun 10, 2021, 08:00 PM IST
पुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कापूरचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? title=

दोन पद्धतीचे कापूर तुम्हाला माहिती असतील. यामध्ये एक जो पूजेसाठी वापरण्यात येतो आणि दुसरा म्हणजे जो कपड्यांमध्ये ठेवला जातो. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापूराला भीमसेमी कापूर म्हटलं जातं. तर कपड्यांमध्ये ठेवला जाणारा कृत्रिम कापूर असतो. या कापूराला केमिकलने बनवलं जातं. मात्र तुम्हाला या कापूराच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का?

फार कमी लोकांना याची माहिती असेल मात्र औषधांच्या निर्मितीमध्ये कापूराचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कापूराचे असे फायदे सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणतील. जाणून घेऊया भीमसेनी कापूराचे महत्त्वपूर्ण फायदे.

1. डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनची साल आणि पांढरं चंदन समान प्रमाणात बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते.

2. कापूर डोळ्यांच्या समस्येसाठी फायदेशीर ठरतं. दुधात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजल सारखी लावल्यास समस्यांपासून मुक्तता मिळते.

3. अनेकदा विविध कारणांमुळे चेहऱ्यावर पुरळ उठते. यावेळी कापूराचं तेल फायदेशीर ठरतं. 

4. चेहऱ्यावरील पुरळमुळे आले की काहीवेळा त्याचे डाग तसेच राहतात. अशावेळी नारळाच्या तेलात कापूर मिसळून या डागांवर लावावं. यामुळे डाग निघून जातात तसंच कोरड्या त्वचेमध्ये ओलावा निर्माण होतो.

5. कापूरमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.

6. प्रदूषण आणि इतर कारणांमुळे आजकाल लोकांना केस गळतीच्या तसंच आणि केसात कोंडा होण्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतंय. यावेळी नारळाच्या तेलात मिसळलेला कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केसगळती या समस्या उद्भवत नाहीत.

7. खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळाच्या तेलात कापूर मिसळा आणि थोडा वेळ ठेऊन द्या. मग या तेलाने छातीवर हलका मसाज करा, हे खूप फायदेशीर आहे.

8. गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.