वजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !

सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 29, 2018, 02:05 PM IST
वजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !  title=

मुंबई : सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.

आजकाल पॉपकॉर्न अनेक फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करण्यासाठी पॉर्पकॉर्न हा उत्तम पर्याय आहे. वजन घटवणार्‍यांच्या आहारात हमखास पॉपकॉर्नचा समावेश केला जातो. पण पॉपकॉर्न खाण्याचे इतरही काही फायदे आहेत. ते तुम्हांला ठाऊक आहेत का ? 

हेल्दी नाश्ता 

साध्या पॉपकॉर्नमध्ये फायबर, पॉलिफेनिक घटक, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक, व्हिटॅमिन बी  कॉम्प्लेक्स, मॅग्नीज घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पॉर्पकॉर्नची चव नक्की चाखा.  

केवळ 30 कॅलरीज  

साध्या म्हणजेच अनफ्लेवर्ड पॉपकॉर्नमध्ये अत्यल्प कॅलरीज असतात. कपभर पॉपकॉर्नमध्ये केवळ 30कॅलरीज असतात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा पॉपकॉर्नमध्ये पाचपट कॅलरीज कमी असतात. पॉपकॉर्न, मक्याचे तेलदेखील आरोग्यवर्धक आहे. 

कोलेस्ट्रेरॉल कमी करते  

पॉपकॉर्नमध्ये फायबर घटक मुबलक असतात. यामुळे शरीरात कॉलेस्ट्रेरॉलचा धोका कमी होतो. सोबतच रक्तवाहिन्या अधिक मजबूत होतात. परिणामी हार्ट अटॅकचा, स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

पचनक्रिया सुधारते  

पॉर्पकॉर्न खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. फायबर घटक आतड्यांच्या मांसपेशींना चालना देते परिणामी पचनक्रिया सुधारते. 

फायदा काय ? 

पॉपकॉर्नमध्ये फायबरप्रमाणेच पोलिफेनोलिक घटक मुबलक असतात. यामुळे शरीराला अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकाचा पुरवठा होतो. मुबलक अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्‍या फ्री रॅडिकल्सचा धोकाही कमी होतो. 

त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसणं, एज स्पॉट, दृष्टी कमी होणं, पेशी कामकुवत होणं, केसगळती अशा समस्या कमी करण्यासाठी मदत होते.