डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा  

राजीव कासले | Updated: Dec 5, 2023, 07:02 PM IST
डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? title=

Health News : डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा करण्यात येतो. चवीला गोड आणि सर्वांना आवडणारा उपाय असल्याने अनेकजण चॉकलेट्सवर ताव मारतात. पण, खरंच असं होतं का...?  डार्क चॉकलेटमुळे (Dark Chocolate) आपल्या आरोग्याला अनेक सकारात्मक फायदे मिळतात. रक्तातील साखर आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर रोगापासून लांब ठेवते. एवढेच नाही तर डॉर्क चॉकलेट खाल्ल्याने तणावही कमी होतो, असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. 

हा दावा केल्यानं आमच्या व्हायरल पोलखोल टीम एक्सपर्टना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच डार्क चॉकलेट्स खाल्ल्याने आयुष्य वाढतं का...? चॉकलेट्समुळे हृदयविकाराचा धोका टळतो का...? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. कोको (Coco) वनस्पतीपासून चॉकलेट बनवतात. डार्क चॉकलेट्समध्ये 75 टक्के कोकोचं प्रमाण असतं. कोकोमुळे हृदयविकार टळू शकतो, कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात राहतं. डार्क चॉकलेट खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचंही म्हणणं आहे. 

ह्दयरोगाचा धोका कमी
डार्क चॉकलेट नियमीत खाल्याने ह्रदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. निरोगी आहारासह डार्क चॉकलेटचं सेवन ह्दयासाठी उपयुक्त ठरु शकतं. 

सूज कमी करण्यास मदत
शरीरात जळजळ होत असेल, किंवा स्नायूदुखी डोकेदुखी होत असेल तर डार्क चॉकलेटचं सेवन फायदेशीर ठरतं. डार्क चॉकलेटमध्ये असलेलं  फ्लेव्होनॉइड्स आणि कोको टीऑक्सिडेंट म्हणून काम करतं आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतं.

आरोग्यासाठी फायदेशीर
डार्क चॉकलेटमध्ये कोकाआ फ्लॅव्हॅनॉल्स असतं, यामुळे आपलं दृष्टी, गती आणि वर्किंग मेमरी लेव्हल सुधारू शकते. चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरतं. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन नावाचा एक रासायनिक पदार्थ आढळतो जो सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. डार्क चॉकलेटमधल्या कोको बीन्समुळे शरीरातील उर्जा वाढते. शिवाय यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमध्ये असलेलं डायटरी फ्लेव्हॅनॉल त्वचेसाठी फायदेशीर ठरत.  रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचा चांगली  राहाते

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)