शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer

दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 7, 2024, 08:32 AM IST
शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer

How Body React Before Heart Attack : बदलती जीवनशैली आणि मानवी सवयी या आजारपणाला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी ठरत आहेत. यामध्ये शरीरातील 5 अवयवांमध्ये हळूहळू बदल होताना दिसतात. या बदलांना तुम्ही दुर्लक्षित करु नका. कारण हे 5 बदल हार्ट अटॅकला आमंत्रण देतात. यामध्ये रोजची एक सवय जी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरते. ती म्हणजे स्मोकिंग. स्मोकिंगला सायलेंट किलर म्हटलं जातं. जितक्या लवकर तुम्ही या वाईट व्यसनापासून मुक्त व्हाल तितके चांगले आहे. फक्त धूम्रपानच नव्हे तर पॅसिव्ह स्मोकिंग देखील शरीरासाठी घातक ठरते.  याबाबत डॉ. इम्रान अहमद यांच्याकडून जाणून घेऊया सिगारेट ओढल्याने हृदयासह कोणत्या अवयवांना इजा होते.

Add Zee News as a Preferred Source

ब्लड शुगर वाढते 

सिगारेट प्यायल्यामुळे शरीरातील ब्लड शुगरमध्ये झपाट्याने वाढ होते. डायबिटिस रुग्णांना धूम्रपानामुळे शरीरातील ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी त्रास जाणवतो. तसेच सिगारेटमधील तंबाखू तुम्ही घेत असलेल्या औषधांचा प्रभाव कमी करतो. जर मधुमेह कंट्रोल झाला नाही तर हृदयाशी संबंधीत आजार जाणवतात. 

हाय ब्लड प्रेशर 

जे लोक प्रमाणापेक्षा जास्त धूम्रपान करतात त्यांचा ब्लड प्रेशर कायमच जास्त राहतो. तसेच ब्लड वेसेल्समध्ये सूज येण्याची  दाट शक्यता असते. यामुळे धमण्या डॅमेज होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हाय बीपीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. 

ब्लड सर्क्युलेशन 

धूम्रपानामुळे धमण्या निकामी होऊ शकतात. याचा परिमाण शरीरातील रक्तप्रवाहांवर पडतो. अशावेळी शरारीतील अनेक अवयवांमध्ये रक्तामार्फत प्रवाहित होणारा ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे अंगदुखी, पायदुखी यासारख्या समस्या जाणवतात. आणि याच ब्लड सर्क्युलेशन होण्याची दाट शक्यता आहे. 

कोलेस्ट्रॉल वाढते 

स्मोकिंग केल्यामुळे शरीरातील घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतो. कोरोनरी आर्टरी डिझीझचा धोका सर्वाधिक असतो. सिगारेटमुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलच प्रमाण सर्वाधिक कमी होतं. आणि घाणेरड्या ब्लॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे स्मोकिंगवर कंट्रोल केलं नाही तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More