Health News: आता नखांचा रंग सांगेल तुमचं आरोग्य चांगलं कि वाईट...स्वतःच करा टेस्ट

कधीकधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर ते शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. तसेच, हे थायरॉईडचंही कारण असू शकतं.

Updated: Dec 23, 2022, 04:14 PM IST
Health News: आता नखांचा रंग सांगेल तुमचं आरोग्य चांगलं कि वाईट...स्वतःच करा टेस्ट  title=

मुंबई : आपली नखं केरॅटिनपासून बनलेली असतात. केरॅटिन (Keratin) हे एक प्रकारचं प्रथिन आहे, जे केसांसाठी आणि नखांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते किंवा शरीरात कोणताही आजार असतो तेव्हा केरॅटिनवरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. अशावेळी नखांचा रंग (Nails Color) बदलू लागतो. पूर्वीच्या काळी बहुतेक तज्ज्ञ डोळे, नखं आणि जीभ पाहून रोगाचे निदान करत असत. आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं. (Health Tips)

नखांचा पिवळा ​​रंग

जर तुमच्या नखांचा रंग पिवळा झाला असेल तर ते शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. याशिवाय फंगल इन्फेक्शन, थायरॉईड, सिरोसिसमुळेही पिवळी पडू शकते. जर तुमची नखं पिवळी पडून जाड होऊन खूप हळू वाढत असतील तर ते फुफ्फुसाच्या समस्येचं कारण असू शकतं.

नखांवर पांढरे डाग

नखांवर पांढरे डाग पडण्याची समस्या अनेकांना दिसून येते. हळूहळू या डागांचा आकार वाढू लागतो. जर ही समस्या तुम्हालाही होत असेल तर कावीळ किंवा यकृताशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे असू शकते.

नखांचा निळा ​​रंग

कधीकधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर ते शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. तसेच, हे थायरॉईडचंही कारण असू शकतं.

नखांचा काळपटपणा

नखं काळी पडणं हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण मानले जाते. त्वचेचा कर्करोग सौम्य वेदना आणि नखं काळी होण्यापासून सुरु होऊ शकतो. याशिवाय बुरशीजन्य संसर्गामुळेही नखं काळी होऊ शकतात. अनेक वेळा दुखापतीमुळे नखांखालील रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्त साचून काळवंडतात. तपकिरी किंवा काळे डाग सामान्यतः नखांभोवतीच्या त्वचेवर पसरतात, हे डाग त्वचेकडे किंवा डोळ्याच्या निओप्लाझमचंही लक्षण असू शकतं. काही वेळा स्यूडोमोनास नावाच्या बॅक्टेरियाच्या वाढीमुळे नखे काळी किंवा हिरवी होऊ शकतात.

पांढरी नखं

जर तुमच्या नखांचा रंग खूप पांढरा असेल तर ते अशक्तपणा, हार्ट फेल्युअर, यकृताचे आजार आणि कुपोषण इत्यादींचे लक्षण असू शकतं. त्याच वेळी, नखांवर पट्टे हे व्हिटॅमिन-बी, बी-12 आणि झिंकची कमतरता दर्शवतं. जर तुमची नखं अर्धी पांढरी आणि अर्धी गुलाबी असतील तर ते शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे असू शकते.