शरीराच्या 'या' समस्या देतात आजारांचे संकेत!

अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही? 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 25, 2018, 08:16 PM IST
शरीराच्या 'या' समस्या देतात आजारांचे संकेत! title=

मुंबई : अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही? मग तुमच्या शरीरात काही पोषक घटकांची कमी आहे. व्हिटॉमिन्स, मिनिरल्स, कॅल्शियम या सर्व पोषकघटकांचा शरीरावर परिणाम होत असतो. ओठांचे फाटणे या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. 

  • याचे प्रमुख कारण म्हणजे पाणी कमी पिणे. याशिवाय व्हिटॉमिन बी-१२ आणि आर्यनची कमी असल्यासही ओठ फाटतात. तुम्हालाही ही समस्या असल्यास आहारात अंडे, कोबी, ब्रोकोली, दाणे यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
  • पायांच्या पेशी खेचल्यासारख्या वाटणे ही समस्या शरीरात कॅल्शियम, पोटॅशियमची कमी असल्यासही ही समस्या उद्भवते. त्यासाठी केळे, पालेभाज्या, भोपळा यांसारखे पदार्थ अवश्य खा.
  • केस गळत असल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता आहे, असे समजावे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे फक्त केसगळत नाहीत तर त्यांची चमकही निघून जाते, केस निस्तेज होतात आणि त्यांना फाटे फुटतात. यासाठी आहारात अंड, डाळी, बदाम, चणे यांचा समावेश करा.
  • अचानक वजन कमी झाल्यास त्याकडे लक्ष द्या. व्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. याचे संतुलन साधण्यासाठी आहारात अंडे, मासे घ्या. शाकाहारी लोकांनी चीज, मशरूम यांसारखे पदार्थ खा.