बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...

Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 10, 2024, 01:06 PM IST
बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...  title=
health tips in marathi Drinking water out of a bottle with your mouth is dangerous

Health Tips In Marathi: पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक समस्याचं निराकरण पाण्यामुळं होऊ शकतं. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच पाणी हे जीवन आहे, असं म्हणतात. पाणी प्यायल्याने निम्मे आजार बरे होतात. सांधेदुखी, शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे, किडणीचे नुकसान आणि अनेक समस्यांवर मात करता येते. कारण आपल्या शरीराचा 60 टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. त्यामुळं दिवसाला पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. मात्र, तुम्ही पाणी कसे पिता, हेदेखील खूप गरजेचे आहे. 

अनेकजण पाणी उभे राहून किंवा बाटलीला तोंड लावून पाणी पितात पण ही पद्धत चुकीची आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याचे गंभीर परिणामांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

बाटलीला तोंड लावून पिण्याचे तोटे

1) बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने त्यात आपल्या तोंडातील लाळ मिसळते. त्यामुळं बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते आजारांचं कारण ठरु शकतात. 

2) बाटलीला तोंड लावून पाणी पिताना आपण एका श्वासात पाणी पितो ते धोकादायक आहे. कारण यामुळं ठसका लागण्याची शक्यता असते. तसंच, एका श्वासात पाणी प्यायल्यामुळं त्रासही होऊ शकतो. 

3 तोंड लावून पाणी प्याल्यामुळं पोट फुगणे यासारख्या समस्याही जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाणी ग्लासात ओतून मगच ते प्यावे. 

एकाच ग्लासातून पाणी पिणं हानिकार?

एकच ग्लास न धुता आठवडाभर पाणी पिण्यासाठी वापरू नये. कारण ग्लासच्या पृष्ठभागावर खूप प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. म्हणून ग्लास नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यावा. 

दररोज किती पाणी प्यायला हवे?

एका व्यक्तीने साधारण 9-13 कप लिक्विड फुडचे सेवन करणे गरजेचे आहे. यात भाज्या, फळांचा यात समावेश करा. कारण यातही पाणी असते. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते. तसंच, उभं राहून पाणी कधीही पिऊ नये. आरामात बसून पाणी प्यावं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)