हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी काही छोट्या - छोट्या टीप्स...

हिवाळ्यात आपलं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं ठरतं

Updated: Nov 24, 2018, 08:42 AM IST
हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी काही छोट्या - छोट्या टीप्स...

मुंबई : हिवाळ्यात सकाळी उठणं तुमच्याही जीवावर येत असेल... व्यवस्थित झोप झाली असेल तरी अजूनही झोप अपूर्णच आहे, असं दिवसभर वाटत राहतं... पण, एकदा का अंथरुणातून उठलं की सकाळी खुपच सुंदर वाटते... त्यातून सकाळंच कोवळ ऊन तर फारच मोहक... याच उन्हातून तर आपल्याला 'डी' जीवनसत्व मिळतं... हिवाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लान्सही बरेच जण आखतात पण, बाहेर फिरताना मात्र आजारी पडलात तर सगळ्या प्लानवर पाणी फेरलं जातं. संसर्गजन्य रोग, हिवताप, सांधे दुखी, सर्दी खोकला, रक्तदाब वाढणं, त्वचा कोरडी पडणं, ओठ फुटणं अशा विविध छोट्या-मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हिवाळ्यात आपलं आरोग्य सांभाळणंही खूप गरजेचं ठरतं.

यासाठी काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील...

- हिवाळ्यात फार थंड पदार्थ  खाणं, फ्रीजमधलं पाणी पिणं टाळावं

- कडक उन्हात फिरू नका सोबतच त्वचा कोरडी पडणार नाही याकडेही लक्ष द्या

पण, मग काय काय कराल...

- आजारी पडलात तर लगेचच डॉक्टरला गाठा

- पण, आजारी पडणार नाही यालाठी घरच्या घरी का होईना पण नियमित व्यायाम करा... त्यामुळे तुमचे स्नायू अखडणार नाही

- नियमित तिळाच्या तेलानं मसाज करा

- घशाला खवखव वाटत असेल तर लगेचच गरम पाण्याच्या गुळण्या सुरू करा

- या दिवसांत थोडं अधिक तेल असलेले पदार्थ जेवणात असले तरी चालेल... कारण या दिवसांत हे पदार्थ सहजच पचतात.

- सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तूप, एक चमचा पिठी साखर आणि थोडेसे मिरे एकवटून खा