हेल्दी लिव्हरसाठी करा या '४' पदार्थांचे सेवन!

लिव्हर म्हणजे यकृत आपल्या शरीरात प्रमुख अंगापैकी एक.

Updated: Jul 11, 2018, 02:17 PM IST
हेल्दी लिव्हरसाठी करा या '४' पदार्थांचे सेवन! title=

मुंबई : लिव्हर म्हणजे यकृत आपल्या शरीरात प्रमुख अंगापैकी एक. लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून अन्न पचनासाठी मदत करते. त्याचबरोबर ब्लडशुगर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉलचे नियमन होते, प्रोटीनची निर्मिती उत्तमरित्या होते. लिव्हरचे कार्य बिघडणे आरोग्यासाठी घातक ठरते. लिव्हरची एक प्रमुख समस्या म्हणजे लिव्हरचा आकार वाढणे. म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होते आणि लिव्हर योग्य प्रकारे काम करु शकत नाही.
 आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देण्यास फार वेळ मिळत नसला तरी आहारात केलेले हे लहान सहान बदल हेल्दी आणि फिट राहण्यास मदत करतील. लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त असे पदार्थ...

लसूण

लसूण शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी अतिशय फायदेशी आहे. भारतीय स्वयंपाकात तर लसणाचे विशेष महत्त्व आहे. लसणाचे नियमित सेवन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या दूर होते.

अक्रोड

शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी अक्रोड हा एक उत्तम उपाय आहे. यात योग्य प्रमाणात ओमेगा3 असते. यकृताचे म्हणजेच लिव्हरचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मद्यपान, नशा न करता अक्रोडचे सेवन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवत नाही.

हळद

भारतीय खाद्यसंस्कृतीत हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. हळदीत अॅंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला फायदा होतो. त्याचबरोबर लिव्हरला कोणतेही नुकसान पोहचू नये म्हणून हळद फायदेशीर ठरते. हेल्दी लिव्हरसाठी हळदीचा उपयोग नियमित करणे गरजेचे आहे. 

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये असलेल्या कॅचिनमुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.    ग्रीन टीमुळे लिव्हरमधील फॅट्स कमी होण्यास मदत होते.