close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वजन कमी करण्याचे ५ घरगुती उपाय

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील. 

Updated: Jun 12, 2019, 02:27 PM IST
वजन कमी करण्याचे ५ घरगुती उपाय

मुंबई : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा वापर करतो. वजन वाढणे ही आता एक समस्या झाली आहे. त्यामुळे आपण अनेक औषधांचा वापर देखील करतो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असेत. तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील. 

- मध आणि लिंबू : सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्यावे. यामुळे सारख्या लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण राहाते.  
- कॉफी आणि लिंबू : अर्धा कप कॉफीमध्ये थोडे गरम पाणी आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण व्यायाम करण्यापूर्वी प्यावे. यामुळे शरिरातील कॅलरीजही बर्न होण्यास मदत होते.

- ओवा : कपभर पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा ओव्याचे दाणे टाका. त्यानंतर पाणी चांगले उकळून घ्या. नियमित व्यायाम करून हे प्यायल्याने वजन कमी होते. 

- दालचिनी : कपभर पाणी उकळून त्यामध्ये १ इंच दालचिनीचा तुकडा मिसळा. १० मिनिटांनंतर हे पाणी गाळून त्यात एक चमच मध मिसळून ३० मिनिटे नाश्ता करण्यापूर्वी प्या. 

- दुर्वा : मेटॅबॉलिक (पचनाचा वेग) रेट सुधारण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. दुर्वा वाटून त्याचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फायदा होतो.