मुंबई : घरात मुंग्या आल्या की खूप त्रास होतो. त्या चावल्यावर तर जीव अगदी नकोसा होतो. त्याचबरोबर साखर, गुळ अशा गोड पदार्थांचे नुकसान होते. अशावेळी किटकनाशकांचा उपयोग करणे मानवी आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. अशावेळी मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. या सोप्या उपयांनी मुंग्यांपासून तुमची आणि घराची सुटका होईल.
मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी मीठ अत्यंत उपयोगी आहे. यासाठी फरशी पुसताना पाण्यात मीठ घाला. असे केल्याने घरात मुंग्या येणार नाही.
घरात ज्या भागात मुंग्या अधिक आहेत त्या ठिकाणी लाल मिरची पावडर घाला. त्यामुळे मुंग्या दूर पळून जातील.
घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी घरच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्यांमध्ये आणि दरवाज्याजवळ लवंग ठेवा.
घर मुंगीमुक्त करण्यासाठी हळद आणि फटकीची पावडर एकक्ष करुन घरातील कोपऱ्यांमध्ये पसरवून ठेवा.