या ३ कारणांमुळे पोटावर झोपणे टाळा!

दिवसभराच्या धावपळीनंतर बेडवर पडल्यावर आरामदायी वाटते.

Updated: May 18, 2018, 10:11 AM IST
या ३ कारणांमुळे पोटावर झोपणे टाळा! title=

मुंबई : दिवसभराच्या धावपळीनंतर बेडवर पडल्यावर आरामदायी वाटते. मग झोप ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. शांत, पूर्ण, गाढ झोपेमुळे आरोग्यही चांगले राहते. पण झोपण्याची स्थिती योग्य असायला हवी. प्रत्येकाची झोपण्याची सवय, स्थिती वेगवेगळी असते. पण पोटावर झोपण्याची सवय असल्यास ती आजच बदला. अन्यथा या समस्यांना सामोरे जावे लागेल. 

पाठीवर विपरीत परिणाम

पोटावर झोपल्याने गुडघ्याचे दुखणे, मानदुखी, पाठीदुखी सारख्या समस्या जडतात. त्यामुळे तुमची झोप नीट होत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे वाटते.

पाठकण्यावरील ताण वाढतो

पोटावर झोपल्याने पाठकण्यावर ताण निर्माण होतो. त्यामुळे पाठकणा हा शरीराचा आधार असल्याने त्यावर ताण निर्माण झाल्यास शरीराचे बाकी अवयव सुन्न होतात आणि अंग दुखू लागते.

मानदुखी

पोटावर झोपल्याने पाठकणा सुस्थितीत राहत नाही. परिणामी मानेला त्रास होतो. त्याला 'हर्नियेटेड डिस्क' असे म्हणतात. यात स्पाईन एका बाजूला शिफ्ट होतो. त्यामुळे जिलेटिनस डिक्समध्ये त्रास होतो. परिणामी मानदुखीला सामोरे जावे लागते.

टिप

जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर नेहमी पातळ उशीचा वापर करा. त्यामुळे डोक्याला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला चांगली विश्रांती मिळेल.