अंडरआर्म्समध्ये (Underarm Smell) वास येण्याची अनेक कारणे असू शकतात. घामामुळे दुर्गंधी येते, तर बॅक्टेरिया आणि घामाच्या मिश्रणामुळे देखील अंडरआर्म्समध्ये दुर्गंधी येते. याशिवाय अंडरआर्म्सच्या केसांमध्ये बॅक्टेरिया आणि घाम जमा होणे आणि व्यायामानंतर अंडरआर्म्समधून दुर्गंधी येऊ शकते. अनेकांना ही समस्या भेडसावत असते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी काय केले पाहिजेत, हे जाणून घेऊयात.
टोमॅटोमध्ये नैसर्गिक पूतिनाशक गुणधर्म असतात जे अंडरआर्ममध्ये (Underarm Smell) दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया मारतात. यासोबतच डेड स्किन सेल्स देखील काढतात, ज्यामुळे अंडरआर्म्स देखील स्वच्छ होतात. टोमॅटोचा लगदा घ्या आणि थेट अंडरआर्म्सवर लावा. 15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा अंडरआर्म्सवर (Underarm Smell) लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका आणि वापरल्यानंतर तुम्हाला चिडचिड होत असेल तर लगेच पाण्याने धुवा. दुर्गंधी दूर करण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडामध्ये पाणी मिसळून पातळ पेस्ट बनवा आणि ती कोरडे होईपर्यंत अंडरआर्म्सवर ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
हळद बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे अंडरआर्म्सचा (Underarm Smell) वासही दूर होईल आणि रंगही स्पष्ट होईल.हळद पावडरमध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि अंडरआर्म्सवर लावल्यानंतर 10 मिनिटांनी धुवा.
लिंबूमध्ये पाणी मिसळावे लागेल आणि ते स्प्रे बाटलीत भरावे लागेल आणि त्वचेवर शिंपडावे लागेल. या स्प्रेने वास निघून जाईल.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)