Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?

Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 23, 2024, 04:42 PM IST
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार? title=

Cancer Treatment Cost: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी भाषण करताना कॅन्सर रुग्णांसाठी बजेटमध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत. कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटी मोफत असल्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे कॅन्सरच्या रूग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

यावेळी कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयानंतर कॅन्सरच्या उपचारावर किती खर्च होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरच्या रूग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. कॅन्सर हा एक गंभीर आजार असून तो जीवघेणा देखील ठरतो. अशातच या रूग्णांच्या उपचारांसाठी किती खर्च येतो याची माहिती घेऊया. 

कॅन्सरचे उपचार इतके महागडे का?

कर्करोग हा एक जीवघेणा आजार असून वर्षभरापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं होतं की, कर्करोगावरील उपचारांसाठी केवळ 20 टक्के रुग्णांना रेडिएशन थेरपीची सुविधा मिळते. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दर 10 लाख लोकसंख्येमागे एक रेडिएशन थेरपीची मशीन असणं आवश्यक आहे. या हिशोबाने देशात जवळपास 1300 रेडिओथेरेपी मशीनची आवश्यकता आहे. कारण केवळी 700 मशीन्स उपलब्ध असल्याची माहिती आहे. सरकारी आणि प्रायव्हेट रूग्णालय मिळून जवळपास 250 रूग्णालयांमध्ये रेडियोथेरेपी दिली जाते. यामधील 200 रूग्णालय खाजगी असून याठिकाणी उपचार सामन्यांना परवडणारे नसतात. 

भारत देशात कॅन्सरसाठी किती येतो खर्च?

कॅन्सरचे अनेक प्रकार असून प्रत्येक कॅन्सरवर औषध आणि उपचाराचा खर्च वेगळा असतो. मात्र जर आपण सरासरी घेतली, तर अहवालांनुसार, कर्करोगावरील उपचार 2,80,000 ते 10,50,000 रुपयांपर्यंत असतात. हा खर्च कॅन्सरच्या स्टेजनुसार कमी-अधिक असू शकतो. रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे 5.25 लाख रुपये खर्च येतो. कर्करोगाच्या तीव्रतेनुसार भारतात केमोथेरपीची किंमत प्रत्येक वेळी सुमारे 18,000 रुपये आहे.