Omicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे

Updated: Dec 28, 2021, 03:31 PM IST
Omicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित? title=

Omicron Variant Update : देशात जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे. ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार, असा इशारा देण्यात आला आहे. 

ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचे दोनही डोस घेतलेलेही ओमायक्रॉनच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होतोय ही धक्कादायक बाब उघड झालीय.

देशात गेल्या काही दिवसात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापैकी सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात 167 ओमायक्रॉनबाधीत आहेत. त्यांच्यापैकी तब्बल 119 जणांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. पण संपूर्ण लसीकरण (Covid-19 Vaccination) झाल्यानंतरही ओमायक्रॉन संसर्गाचा धोका असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

या पार्श्वभूमीवर लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक वर्तनाबाबत गाफील न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.  लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, हात धुणे, अंतर राखणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव सर्वानी ठेवणं आवश्यक आहे. 

त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ओमायक्रॉन बाधित रुग्णांची स्थिती गंभीर नसून अनेकांमध्ये सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे लसीकरण झालेल्यांना ओमायक्रॉनची लागण झाली तरी त्याचा फारसा धोका नाही.