जेवणात फ्रोजन वाटाणे वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात.

Updated: Dec 25, 2021, 07:42 PM IST
जेवणात फ्रोजन वाटाणे वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या title=

मुंबई : मटारचं पिक हे हिवाळ्यात जास्त प्रमाणात येतं. त्यामुळे या सीजनमध्ये आपण घरी देखील या भाज्या जास्त प्रमाणात बनवतो. हॉटेलमधील बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला मटारचा समावेश असलेले पाहायला मिळते. परंतु जेव्हा मटारचा सीझन संपतो तेव्हा आपण फ्रोजन मटारच्या पर्यायाकडे वळतो. परंतु याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? तज्ज्ञांच्या मते, फ्रोजन मटारचे सेवन केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात. ज्यामुळे तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मटार खाण्याचा आनंद घेऊ शकता. परंतु असे करणं शरीरासाठी योग्य नाही.

शेंगांमधून काढलेले वाटाणे हे ताजे असतात आणि ते फ्रोजन मटारपेक्षा आरोग्यासाठी चांगले मानले जातात. फ्रोजन वाटाणे वापरण्यास सोपे असले, तरी ते ताज्या वाटाण्यांपेक्षा कमी चवदार असण्यासोबतच ते शरीरासाठी हानिकारक देखील असतात. फ्रोजन मटारमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते. त्याचबरोबर त्यात पोषक घटकही कमी होतात. ताज्या वाटाण्यामध्ये मात्र असे होत नाही. तज्ज्ञांच्या मते, जेवणात ताजे मटार शक्यतो वापरा आणि फ्रोजन मटारचे सेवन टाळा.

हे लक्षात घ्या की, गोठवलेल्या पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीचे वजन वाढू शकते. त्यात भरपूर फॅट्स आढळतात, यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचेल. गोठलेले पदार्थ ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फ्रोजन पदार्थ हानिकारक ठरू शकते.

फ्रोजन पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाणही खूप जास्त असते, जे हृदयरोग्यांसाठी धोकादायक ठरू शकते. फ्रोजन पदार्थांमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

(नोट : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी24तास याची कोणतीही पुष्टी करत नाही.)