High Chelosterol Worst Food: आपण आपल्या आहाराला घेऊन नेहमीच सतर्क असतो. त्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे डाएट फोलो करत असतो. परंतु अद्यापही काही लोकांना आणि आपल्यापैंकी अनेकांना बाहेरचे अरबटसरबट पदार्थ खायची सवय असते. त्यात बऱ्याचदा जंक फूडचा समावेश असतो. तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्याने मग कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो.
अनेक जण इंटरनेटवर जाऊन कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु चुकीच्या आहाराला आणि चुकीच्या जीवनशैलीला बळी पडायचे नसेल आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढवायची नसेल तर आरोग्याला अनुरूप असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. ज्यात जंक फूडचे सेवन बंद करणे आवश्यक असते.
कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा पदार्थ शरीरात यकृताद्वारे तयार होतो ज्याची वाढ आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोलेस्टेरॉल शरीरातून A, D, E, आणि K जीवनसत्त्वे शोषून घेते. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे HDL (हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) जे Good कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते आणि दुसरे LDL (लो डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) जे Bad कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते.
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. कोलेस्टेरॉल वाढण्यास अयोग्य आहार आणि चूकीची जीवनशैली कारणीभूत आहे. आहारात खालील पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने वाढू शकते.
प्रोसेस फूड: आहारात प्रोसेस केलेले अन्न आणि गोड पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असते ज्याने कोलेस्ट्रॉलची चिंता वाढते.
मटण: कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास मटण खाणे टाळा. मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅट, मांस, प्रोसेस केलेले मांस, आणि डुकराचे मांस यांमध्ये चरबी जास्त असते.
चिकन: चिकनच्या skin मध्ये कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल जास्त असते त्यामुळे ते खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते.
फुल फॅट डेअरी प्रोडक्ट्स: फुल क्रीम मिल्क, लोणी, दही आणि कॉटेज चीजमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते.
तळलेले अन्न: फ्रेंच फ्राईज, तळलेले चिकन आणि डीप फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि ज्या तेलात ते शिजवले जाते त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते तेव्हा अशा पदार्थांना वेळीच आळा घाला.
मानसिक तणावही कारणीभूत...
तणावापासून दूर राहा कारण तणावामुळे कोलेस्ट्रॉलही वाढते. जर तुम्ही दीर्घकाळ तणावाखाली असाल तर कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.
काय खाल?
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कमी चरबीयुक्त दह्याचे सेवन करू शकता त्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील. बटरऐवजी ऑलिव्ह ऑईल आणि अॅव्होकॅडो ऑईलचा तूम्ही वापर करू शकता.