सतत खुर्चीवर बसून काम करत असाल, तर हे वाचाच

सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे.

Updated: Aug 1, 2019, 08:40 PM IST
सतत खुर्चीवर बसून काम करत असाल, तर हे वाचाच title=

मुंबई : ऑफिसमध्ये सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक, विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणं, कंप्यूटर, स्मार्टफोनवर पाहतं राहणंदेखील शरीराला नुकसान पोहचवत असतं. काही महिन्यांपूर्वी केल्या गेलेल्या संशोधनातून याबाबत आश्चर्यचकित करणारी तत्थ समोर आली आहेत. 

अमेरिकेतील मेयो येथील एका क्लीनिकमधून याबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनातून शारीरिक असक्रियता धुम्रपानाइतकीच घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संशोधनानुसार, खांदे, पाठ, कंबरदुखीच्या समस्येपासून ते अगदी टाइप-2च्या डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी चालण्या-फिरण्याचा, व्यायाम करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दिवसभर बसण्याची किंवा पडून राहण्याची सवय स्मरणशक्तीसाठी घातक असल्याचीही शक्यता संशोधनातून वर्तवण्यात आली आहे.

संशोधनादरम्यान, अधिकतर युवक जवळपास 8 तासांपर्यंत खुर्चीवर बसत असल्याचं, तसंच टिव्ही किंवा मोबाईल पाहण्यासाठी एकाच जागेवर 3 तास बसून असल्याचं समोर आलं.

शारीरिक स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी, दररोज जवळपास 10 हजार पाऊलं चालणं आवश्यक आहे. आठवड्यातून 6 दिवस कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं गरजेचं आहे.

संशोधनकर्त्यांनी ऑफिसमध्ये एकाच जागी बसण्याबाबत काही उपाय सुचवले आहेत-

ऑफिसमध्ये पाण्याची बाटली भरुन न ठेवता, तहान लागल्यास जागेवरुन उठून पाणी प्यावे. 

ऑफिसमध्ये शक्य असल्यास आपल्या जागेवरच किंवा दुसऱ्या ठिकाणी स्ट्रेचिंग करावे.

नाश्ता किंवा जेवणासाठी शक्यतो कॅन्टिनमध्ये जावे. जागेवरच खाऊ नये.

शक्य असल्यास लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करावा.