चंद्रग्रहण 2018 : ग्रहणादरम्यान कोणते पदार्थ खाणं सुरक्षित आहे?

यंदा गुरूपौर्णिमेला म्हणजे 27 जुलै 2018 ला या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे.

Updated: Jul 26, 2018, 05:40 PM IST
चंद्रग्रहण 2018 : ग्रहणादरम्यान कोणते पदार्थ खाणं सुरक्षित आहे? title=

मुंबई : यंदा गुरूपौर्णिमेला म्हणजे 27 जुलै 2018 ला या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. 27 जुलैच्या रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. 28 जुलैच्या सकाळी 3 वाजून 5 मिनिटांनी चंद्रग्रहण संपणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतककाळ हा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. 

जगभरात विविध ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणासोबत येणार्‍या समज गैरसमजामुळे अनेक लोक बैचेन होतात. ग्रहण ही केवळ एक भौगोलिक स्थिती असल्याने ती अटळ असते. परंतू ग्रहणाचा काळ अशुभ मानून अनेकजण या काळात जेवणं टाळतात. ग्रहणाबाबातचे समज - गैरसमज आणि त्यागील वैज्ञानिक कारणंदेखील जाणून घ्या 

ग्रहणादरम्यान न जेवणाचा सल्ला का दिला जातो?

ग्रहणादरम्यान ब्लू रेडीएशन्स पृथ्वीपर्यंत पोहचत नाहीत. परिणामी अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरियाची वाढ अधिक वेगाने होते. यामधून फूड इंफेक्शन होण्याची शक्यता वाढते. म्हणून ग्रहणादरम्यान अन्न न शिजवण्याचा तसेच साठवलेले अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो

भूक लागल्यास काय खाल ? 

ग्रहणादरम्यान जेऊ नये असे सांगितले जाते. मात्र तुम्हांला या काळात भूक अनावर होत असेल तर काही पदार्थांमुळे तुम्ही त्यावर मात करू शकता. 

वयोवृद्ध, गरोदर किंवा आजारी व्यक्तींना फार काळ उपाशी राहणं शक्य नाही. अशावेळेस सात्विक आहार घ्यावा. पचायला हलके असल्याने त्रास कमी होतो.

ग्रहणाच्या काळात तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. 

ग्रहणादरम्यान कच्च्या भाज्यांचा, फळांचा आहारात समावेश करणं टाळा. यामध्ये ग्रहणादरम्यान  काही बदल होण्याची शक्यता कमी होते. 

ग्रहणात शिजवलेल्या, साठवलेल्या पदार्थांपासून दूर रहावे. ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. 

ग्रहणादरम्यान मांसाहार, अल्कोहल, हाय प्रोटीनयुक्त पदार्थ टाळावेत. मात्र ग्रहणाचा काळ संपल्यानंतर तुम्ही सामान्यपणे जेवू शकता. ग्रहणानंतर फळं खाणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. सोबत शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते.