हे आहे 48 वर्षीय मलायका अरोराच्या चमकदार त्वचेचे रहस्य, ती वापरते हे 3 घरगुती उपाय

  त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके सोपे आणि स्वस्त आहेत की तुम्ही आजपासूनच तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.

Updated: Jul 27, 2022, 02:40 PM IST
हे आहे 48 वर्षीय मलायका अरोराच्या चमकदार त्वचेचे रहस्य, ती वापरते हे 3 घरगुती उपाय title=

BEAUTY TIPS:  अभिनेत्री मलायका अरोरा यांच्यावर वाढत्या वयाचा प्रभाव फारच कमी दिसून येतो. तिची त्वचा अशा प्रकारे चमकते की वयाच्या 48 व्या वर्षीही इतर अभिनेञींच्या ग्लो तिच्यासमोर फिका पडतो. यामुळेच प्रत्येक मुलीला अशी हेल्दी स्किन हवी असते. तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके सोपे आणि स्वस्त आहेत की तुम्ही आजपासूनच तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.

 शुगर स्क्रब 

मलायका अरोरा डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रब वापरते, जी ती स्वतः स्वयंपाकघरातील काही वस्तुंपासून घरी तयार करते. यासाठी मलायका प्रथम कॉफी पावडर घेते, त्यात ब्राऊन शुगर आणि नंतर तेल घालते. या मिक्समध्ये ती सहसा नारळ किंवा बदामाचे तेल मिसळते, असे अभिनेत्रीने सांगितलय. ब्राऊन शुगर उपलब्ध नसली तरी स्वयंपाकघरात असलेली साखर वापरता येईल.
हे होम स्क्रब त्वचेवर वर्तुळाकार गतीने घासावे लागते आणि नंतर पाण्याने धुवावे लागते. हे केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर वापरले जाऊ शकते.

दालचिनी मास्क


मलायकाला सुदधा त्वचेच्या समस्यांशी झगडावं लागतं. तीलासुद्धा मुरुमांच्या समस्येला सामोरम जावेम लागत असल्याचम तीने शेअर केले. या त्वचेच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती दालचिनीचा फेस पॅक लावते. ते बनवण्यासाठी ती दालचिनी पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून फेस पॅक बनवते.

कोरफड जेल


मलायका एलोवेरा जेलचा भरपूर वापर करते, त्यामुळे तिने त्याची रोपंही घरी ठेवली आहेत. हा मास्क बनवण्यासाठी फक्त कोरफडीचा तुकडा घ्या, तो कापून घ्या आणि जेल काढा. चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे दिवसभर चेहरा टवटवीत आणि नितळ राहील.

तसेच, मलायका तिच्या चमकदार त्वचेसाठी आहार आणि व्यायामाची देखील काळजी घेते. यासोबतच ती त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर नक्कीच वापरते. तिने चेहऱ्यावर कोणताही पॅक किंवा स्क्रब लावला तरी ती धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरत नाही.

( वर दिलेल्या टिप्स अभिनेत्रीने शेअर केलेल्या माहितीवर आधारित आहेत. zee२४ taas त्यांच्या परिणामकारकतेची पुष्टी करत नाही. त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.)