स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ कमी करतील पित्ताचा त्रास

पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावते. 

Updated: Jul 10, 2018, 08:55 PM IST
स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ कमी करतील पित्ताचा त्रास  title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आहारात बदल झाल्यास किंवा दुषित पाण्याचा, आहाराचा समावेश झाल्यास पोट बिघडते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, खानपानासोबत झोपेचे चक्र बिघडल्याने पित्ताचा त्रास बळावू शकतो. अशा वेळेस काही घरगुती उपायांच्या मदतीने पित्ताचा त्रास कमी करता येऊ शकतो.  जलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर .

काय आहेत घरगुती उपाय? 

लवंग - 

पित्त  किंवा पोटात गॅसचा त्रास होत असल्यास लवंग चघळा. लवंगामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.  

जीरं -  

चमचाभर जीरं तव्यावर भाजा. भाजलेलं जीरं हलकं होतं, त्याची बारीक पावडर करा. ग्लासभर पाण्यासोबत जिर्‍याची पावडर खावी. रात्रीच्या जेवणानंतर पाण्यासोबत जिर्‍याची पावडर खाणं फायदेशीर ठरतं. 

गूळ -

पित्ताच्या त्रासासोबत छातीत जळजळ जाणवत असल्यास गूळाचा तुकडा चघळा. मधुमेहींनी हा उपाय टाळावा.  

तुळशीचं पानं - 

तुळशीची पानं पित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतात. 5-6 तुळशीची पानं चघला किंवा तुळशीचा काढा प्यावा. या घरगुती उपायांनी पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

ताक - 

पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. एक चतुर्थांश चमचा काळामिरी पावडर ग्लासभर ताकामध्ये मिसळून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होतो. या उपायामुळे पित्तापासून आराम मिळतो. 

आलं - 

जेवणापूर्वी अर्धा तास आल्याचा लहानसा तुकडा चघळा. यामुळे पित्त, अपचन अशा समस्यांपासून आराम मिळतो.