बटाटा अधिक खाल तर वाढेल या '4' समस्यांचा धोका !

बटाटा हा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केला जातो. 

Updated: Aug 16, 2018, 08:19 AM IST
बटाटा अधिक खाल तर वाढेल या '4' समस्यांचा धोका !  title=

मुंबई : बटाटा हा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केला जातो. बटाट्याचा आहरातील समावेश चविष्ट असल्याने अनेकांना ती भाजी आवडते. मात्र बटाट्यावर ताव मारणं काहींच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बटाटा आटोक्यात खाणं फार गरजेचे आहे. 

गॅसचा त्रास - 

अधिक प्रमाणात बटाट्याचा आहारात समावेश केल्याने पोटात गॅस होण्याचा त्रास उद्भवू शकतो. तुम्हांला पचनाचा त्रास असल्यास बटाट्याचा आहारातील  समावेश  नियंत्रणात ठेवा. अशावेळेस बटाटा कमी खावा. 

रक्तातील साखर - 

मधुमेहाच्या रूग्णांनीदेखील आहारात बटाट्याचा समावेश कमी करावा. रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी बताटा प्रमाणात खाणं गरजेचे आहे. बटाट्यामध्ये ग्लायस्मिक इंडेक्स अधिक असल्याने झटकन रक्तातील साखरेचे प्रमाणाही वाढते. 

रक्तदाब - 

रक्तदाबाच्या रूग्णांसाठीही अधिक प्रमाणात बटाटयाचं सेवन करणं त्रासदायक ठरू शकतं. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास बळावतो. रिसर्चनुसार, आठ्वड्यातून चार वेळेस किंवा त्याहून अधिक वेळेस बटाटा आहारात असल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका बळावतो. 

वजन वाढणं -

बटाट्याचा योग्यरित्या आहारात समावेश केल्यास बटाटा तुम्हांला वजन घटवायलाही मदत करू शकते. मात्र डीप फ्राय, फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपात बटाट्याचा आहारात समावेश करणं टाळा. फॅट्स वाढतील अशा स्वरूपात बटाटा खाऊ नका.