तुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Purity of Mango : आंब्याता सीझन सुरु झाला... आता आंबा हा रोजच्या आराहाचा एक भाग झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का? पण तुम्ही खात असलेला आंबा हा नैसर्गिक रित्या पिकवला आहे की रसायनच्या मदतीन. यामुळे तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2023, 06:55 PM IST
तुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार title=
(Photo Credit : File Photo)

Purity of Mango : सध्या आपल्याकडे आंब्याचा सीजन सुरु झालाआहे. उन्हळ्यात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. हापूस,  लंगडा, तोतापरी इत्यादी अनेक प्रकारचे आंबे सध्य़ा आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्य आहेत ते आंब्यात आहेत. आंब्यामध्ये असलेलं फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर  पोषक घटक. शरीराला अनेक फायदे देतात. म्हणून बोलतात ना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबा नाही खाल्ला तर तुम्ही काय केलं... पण तुम्हाला माहित आहे का? बाजारात अनेकदा विषारी द्रव्यांनी पिकवलेले आंबे देखील विकायला ठेवलेलं असतात. जे आपल्या आरोग्याला हानीकारक असतात, त्यामुळे आपण खात असलेले आंबे हे विषारी आहेत की नाही हे कसे तपासावे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

उन्हाळा म्हणजे आंब्याच्या सीजनच असतो. आंब्याच्या सीजनमध्ये पुरवठा अधिकाधिक करण्यासाठी बऱ्याचवेळा आंबे अनैसर्गिक पद्धतीने पिकवले जातात. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल? आंबा अनैसर्गिक पद्धतीने पिकवण्यासाठी विषारी रसायनांचा वापर केला जातो. ज्याचे शरीरावर  अनेक दुष्परिणाम होतात. तर FSSAI नं (Food Safety and Standards Authority of India) आंब्यावर असलेल्या विषारी रसायनांची तपासणी करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. 

हेही वाचा : 'मॅडम जरा वजन कमी करा...', सल्ला देणाऱ्या पत्रकाराला Vidya Balanचं सडेतोड उत्तर

FSSAI  नुसार, आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड या केमिकलचा वापर  केला जातो. जे ऍसिटिलीन हा वायू निर्माण करतात आणि या वायूमुळे आंबा लवकर पिकतो. कॅल्शियम कार्बाइड या केमिकलला 'मसाला' असेही म्हणतात. आंब्याव्यतिरिक्त केळी, पपई यासारखे इतर फळ पिकवण्यासाठीही या रसायनाचा वापर केला जातो. अशा आंब्याच्या सेवनानं शरीराला होणारे साईड इफेक्ट त्यांनी सांगितले आहेत. जर तुम्ही खात असणाऱ्या आंब्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, जास्त तहान, चिडचिड, अशक्तपणा, अन्न गिळण्यात अडचण, उलट्या, त्वचेचे व्रण अशा काही समस्या होत असतील तर तुम्ही खाल्लेला आंबा हा पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला असू शकतो. 

उन्हाळ्यात आंब्याची वाढती मागणी पाहता कमी खर्चात आणि जास्त आंबे पुरवण्यासाठी हा प्रकार करण्यात येतो. एवढंच नाही तर अशा प्रकारे आंबे जास्त काळ टिकूनही राहतात. ज्यामुळे आंब्याचा रंग, आकार आणि चवीमध्ये देखील बदल होतो.कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याप्रमाणेच दिसतात. परंतु त्यांच्यात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते आणि शरीराला त्याचे दुष्परिणादेखील  होऊ शकतात