मुंबई: डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळालेले आहे. भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. पण यामागील नेमकं कारण तुम्हांला ठाऊक आहे का?
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1991साली भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच 'भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे.
डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला. फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात.
रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.
जगभरात डॉक्टर्स डेचं वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेशन केले जाते. अमेरिकेमध्ये 30 मार्च दिवशी डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो. यापूर्वी हे सेलिब्रेशन 9 मे रोजी केले जात असे. ईरान, क्युबा या देशात वेगवेगळ्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
रूग्णांच्या सेवेसाठी 24X7 कार्यरत असणार्या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जातात. याकरिता ग्रिटिंग्स,मेसेज पाठवले जातात.