धक्कादायक, मुंबईत टीबी रुग्णांत होतेय वाढ

क्षयमुक्त भारत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. सरकारी स्तरावर गेली अनेक वर्ष यावर काम सुरू आहे. दिवसेंदिवस क्षय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

Updated: Jun 24, 2017, 11:51 PM IST
धक्कादायक, मुंबईत टीबी रुग्णांत होतेय वाढ title=
संग्रहित छाया

मुंबई : क्षयमुक्त भारत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. सरकारी स्तरावर गेली अनेक वर्ष यावर काम सुरू आहे. दिवसेंदिवस क्षय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

मुंबईसारख्या शहरात शिवाजीनगर, गोवंडी आणि धारावी झोपडपट्टीत क्षय रुग्णांची संख्या जास्त आहे. शासकीय रुग्णालयातील व्यवस्था पाहून अनेक रुग्ण या रुग्णालयाकडे पाठ फिरवतात. शिवडीत क्षय रुग्णांसाठी विशेष रुग्णालय आहे. तिथे रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना ताटकळत बसावं लागतं. यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार करतात. 

खासगी उपचार गरीब रुग्णाला परवडत नाही. तर खासगी, शासकीय आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम केलं तर क्षयरोगावर मात करू शकतो, असं डॉक्टरांनी मत व्यक्त केलंय. शासनाने यावर आता उपाय म्हणून काही सामाजिक संस्था सोबत घेऊन खासगी रुग्णालयाततही क्षय रुग्णांवर नाममात्र दरात उपचार सुरू करीत आहे.