अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍या नववधू व वरांंच्या ‘हळदी’साठी खास टीप्स

लग्नातील एक सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे हळद !  

Updated: May 5, 2018, 04:08 PM IST
अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍या नववधू व वरांंच्या ‘हळदी’साठी खास टीप्स title=

मुंबई : लग्नातील एक सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे हळद !   लग्नाच्या किमान एक दिवस आधी होणार्‍या या विधीचा पिंपल्सची समस्या असणार्‍यांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये पिंपल्सची समस्या सर्रास आढळते. हळदीमुळे नववधूच्या चेहर्‍यावर पिंपल्स येण्याची शक्यता अधिक असते. पण डॉ.निर्मला शेट्टीनी त्यांच्या ‘ ब्युटी अ‍ॅट युअर फिंगरटीप्स’ या पुस्तकात सांगितलेला उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

उपाय -: 

एक टीस्पून हळदीमध्ये दोन टीस्पून मूगडाळीचे पीठ मिसळा.
10 तुळशीची आणि पुदीन्याची पानं व अर्धी काकडी मिसळा.
हे मिश्रण एकत्र वाटून घ्या.
तयार मिश्रणात अधिक काहीही न मिसळता चेहर्‍यावर व मानेवर लावा.
हळद चेहर्‍यावर अधिक न चोळता विधी झाल्यानंतर लगेचच कोमट पाण्याने स्वच्छ करा.
नेहमीच्या हळदीपेक्षा तुम्ही हे मिश्रण नक्कीच वापरू शकता. तुमच्या सोयीनुसार हे मिश्रण तुम्ही वाढवू शकता. या पेस्टमुळे अ‍ॅक्नेची समस्या टाळण्यास मदत होते. तसेच यामुळे चेहर्‍यावर नैसर्गिकरित्या ग्लो वाढण्यास मदत होते. तसेच दुसर्‍या दिवशी चेहर्‍यावर पिवळेपणा राहणार नाही.