थंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत

थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.

Updated: Nov 4, 2017, 10:06 PM IST
थंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत title=

मुंबई : थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.

शेंगदाणे स्वस्तही असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात शेंगदाण्यांचे भाव वाढतात. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये १ लीटर दूधाच्या बरोबरीचे प्रोटीन असतात. शेंगदाणे अनेकप्रकारे या दिवसात उपयोगात येतात. त्वचेवरील किटाणूंना नष्ट करण्यात शेंगदाणे मदत करतात. चला जाणून घेऊया आणखी फायदे....

हृदयासाठी चांगले -

आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयासंबंधीच्या रोगांची शक्यता पूर्णपणे कमी होते. यासोबतच कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रीत करण्याचे काम यामुळे होते. 

हाडांच्या मजबूतीसाठी -

शेंगदाणे खाल्ल्यास हाडांनी मजबूती मिळते. याचं कारण म्हणजे यातील कॅल्शियम आणि व्हिटामिन डी. हा हाडांसाठी एक चांगला आणि स्वस्त इलाज आहे. 

हार्मोन्सच्या संतुलनासाठी -

शरिराच्या विविध प्रक्रियांना व्यवस्थित चालवण्यासाठी हार्मोन्सचं संतुलन आवश्यक असतं. रोज शेंगदाणे खाल्ल्याने पुरूषांचे आणि महिलांचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळते. 

कॅन्सरच्या उपचारासाठी -

शेंगदाण्यांमध्ये पॉलिफिनॉलीक नावाचं अ‍ॅन्टी-ऑक्सिडेंट मिळतं. ते पोट साफ करण्याची क्षमता ठेवतं. २ चमचे शेंगदाण्यामध्ये लोणी घालून एक आठ्वडा सेवन केल्यास कॅन्सरची शक्यता अधिक कमी होते. 

प्रजनन क्षमता वाढण्यासाठी -

शेंगदाण्यात फॉलिक अ‍ॅसिड असतं. शेंगदाणे गर्भावस्थेदरम्यान भृणमध्ये न्यूरल ट्यूबच्या दोषांना कमी करतं. सोबतच महिलांमध्ये प्रजनन शक्ती अधिक चांगली करते.