मुंबई : सणाच्या दिवसांत किती ही नाही म्हटलं तर जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच. कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करा. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सुचवणार आहोत.
लींबूमध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुम्ही पचनशक्ती देखील चांगली करतं. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते.
कोथिंबीरमुळे देखील पचनशक्ती चांगली होते. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील चांगला राहतो. कोथिंबिरीमुळे शरीरातील लेड आणि मरकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचे डिटॉक्स होते. कोथिंबीर तुम्ही सलाड, डाळ आणि कढीमध्ये भरपूर प्रमाणात टाकून खावू शकतात.
टॉमेटो तुमच्या शरीरातील डिटॉक्स अतिशय चांगल्या प्रमाणात करतात. सणाच्या दिवसांत जेवण अधिक झाल्यावर शरीरात समतोल राखण्यासाठी पुढच्या जेवणात टॉमेटोचा वापर अधिक करावा.
एक वाटी दही कायमच शरीरासाठी चांगल असतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पचनशक्ती सुधारते. कारण यामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात ज्याने अन्न पचनास मदत होते.