प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!

प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.

Updated: Jun 3, 2018, 07:48 AM IST
प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय! title=

मुंबई : प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास प्रेगनेंट महिला अॅसिडीटीच्या समस्येपासून दूर राहू शकतात. त्यासाठी काही साधे सोपे उपाय...

१. झोपताना बेडवर आपले डोके सहा इंचाहून अधिक वर ठेऊ नका. कारण त्यामुळे पोटातील गॅस पचननलिकेच्या वरच्या भागापर्यंत पोहचतो. त्यामुळे अधिक त्रास होतो. त्यामुळे जास्त उंच उशी घेऊ नका.

२. उशिरा खावू, जेवू नका. रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. जेवण आणि झोपण्याच्या वेळेत ३ तासांचा फरक राहू द्या.

३. चहा किंवा कॉफी अधिक प्रमाणात पिऊ नका. या पदार्थांमुळे हार्टबर्न म्हणजे छातीतील जळजळ वाढण्यास मदत होते. चहा-कॉफीमुळे हृदयाची गती वाढते. त्यामुळे हे पदार्थ टाळलेलेच बरे.

४. प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटीवर स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्लानुसारच औषधे घ्या.

५. प्रेग्नेंसीच्या काळात हेव्ही जेवू नका. एकाच वेळी खूप खावू नका. त्याऐवजी काही वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा. जर तुम्ही दिवसातून तीन वेळा खात असाल तर त्याऐवजी सहा वेळा खा. त्याचबरोबर फ्लूड्सचे सेवन वाढवा. त्यामुळे अॅसिडीची समस्या उद्भवण्यास आळा बसेल.