थंडीत सेन्सिटीव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स...

थंडीत त्वचा कोरडी, रूक्ष होते. फुटते, पांढरी पडते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 2, 2017, 10:35 AM IST
थंडीत सेन्सिटीव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स... title=

मुंबई : थंडीत त्वचा कोरडी, रूक्ष होते. फुटते, पांढरी पडते. अशा नानाविध समस्या उद्भवतात. मात्र सेनसिंटीव्ह त्वचा असणाऱ्यांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी म्हणजे फक्त क्लीजिंग, टोनिंग आणि मॉश्चराईज़िग पुरेसे नाही.मग काय करावे ? त्यासाठी काही खास टीप्स.

टीप्स...

  • जर तुम्हाला एक्जिमा, सोरियासिस आणि सेबोरोइया यांसारखे आजार असल्यास थंडीत तो त्रास वाढू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषोधोचार करा.
  • त्वचा कोरडी होत असल्यास हायड्रेट करण्यासाठी फेशियलचा पर्याय तुम्ही निवडू शकता. तसंच अंघोळीनंतर नियमित मॉश्चराईजर लावा.
  • थंडीत एटोपीक डर्माटायटिस, सोरियासिस, एक्जिमा आणि इचथायोसिस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खाज, जळजळ होऊ शकते. अशावेळी योग्य क्रीमचा वापर करा.
  • अंघोळीच्या पाण्यात तेलाचे काही थेंब घाला. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.